'बोलत कां नाहीं ? ' तिनें विचारिलें.

'तूझी देवपूजा झाली, परंतु माझी राहिली. चल, शेतावर लौकर जाऊं. माझ्या देवाची पूजा अंतरेल. सायंपूजा.' तो म्हणाला. दोघें शेतावर आलीं.

'कृष्णे, तुला दूध काढतां येतें का ? ' त्याने विचारिलें.

'हो. मी काढूं ? ' तिनें विचारिलें.

'काढ. माझ्या देवपूजेची मी तयारी करतों.' तो म्हणाला.

कृष्णी दूध काढीत होती. चरवी भरली तरी कास रिती होईना. कृष्णीची बोटें दुखूं लागली.

'दुसरें भांडे द्या. हें भरलें.' कृष्णीने सांगितलें.

कार्तिक आला. भांडे भरलेले पाहून तो चकित झाला.

'इतकें कसें दूध ? ' त्यानें विचारिलें.

'अजून कास भरलेली आहे.' ती म्हणाली.

'आश्चर्य ! तुझ्या हातांत का जादू आहे ? ' त्यानें विचारिलें.

'माझ्या हातांत प्रेम भरलेलें आहे ! आज माझ्या शरीराचे अणुरेणु अनंत प्रेमानें भरलेलें आहेत.' ती म्हणाली.

'पुरे कर दूध.' तो म्हणाला.

दोघें झोंपडीत आलीं.

'झालीं का तुमची देवपूजा ? ' तिनें विचारिलें.

'तूं त्या बाहेरच्या उंच शिलासनावर बस. मी येतों.' तो म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel