५१. भांडवलावर डल्ला.
(सवण्णजातक नं. १३६)
बोधिसत्त्व एकदां ब्राह्मण कुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर एका कुलीन कन्येबरोबर त्याचें लग्न होऊन त्या संबंधापासून त्याला तीन मुली झाल्या; परंतु दुर्दैवाची गोष्ट ही कीं, त्या मुलींचीं लग्नकार्ये होईपर्यंत तो जगला नाहीं. मेल्यावर तो हिमालयातील एका हंसकुलांत जन्मला. त्याच्या पूर्वपुण्याईमुळें मधून मधून त्याला सोन्याची पिसें फुटत असत; आणि पूर्वजन्मीचें स्मरण करण्या इतकेंहि त्याच्या अंगी सामर्थ्य होतें. तो बराच मोठा झाल्यावर पूर्व जन्मीं आपण कोण होतों याचा विचार करीत बसला; आणि त्याच्या सामर्थ्यानें पूर्व जन्माची त्याला सर्व आठवण झाली. आपल्या पोरक्या मुलींना आणि अनाथ स्त्रीला टाकून कर्मगतीमुळें मरण आलें याचें त्याला क्षणभर दुःख झालें. पण तो आपल्या मनाशींच म्हणाला, ''आतां शोक करीत बसण्यांत अर्थ नाहीं. सर्व प्राणी कर्माला वश असल्यामुळें कर्म जी गोष्ट घडवून आणतें तिचा त्यांनीं विषाद मानतां कामा नये. माझ्या पूर्व जन्मीच्या कुटुंबाची जर विपन्नावस्था असेल, तर मला त्यांना या हंसयोनींत जन्मून देखील थोडीबहुत मदत करतां येण्यासारखी आहे, हें मी माझें मोठें भाग्य समजतों. माझीं पिसें जून झाल्यावर सोन्याचीं बनत असतात; असें एखादें पीस आठचार दिवसांनीं त्यांना दिलें असतां तीं आपला निर्वाह करून सुखानें राहतील.''
असा विचार करून तो हंस तेथून उडाला आणि थेट आपल्या पूर्वजन्मींच्या घरीं गेला. त्याला आपल्या पूर्व कुटुंबाची दुर्दशा तेव्हांच दिसून आली. बाई दळण कांडण करून निर्वाह करीत होती. व त्या तिघी मुली मुलांना सांभाळण्याचीं वगैरे कामें करून कसा तरी निर्वाह करीत असत. घराची पूर्वीची सर्व शोभा नष्ट झाली होती ती सर्व स्थिती पाहून हंसाला फार कींव आली व तो त्या मुलींना म्हणाला, ''मुलींनो, तुम्ही अत्यंत दुर्गत दिसतां; परंतु तुमची दुर्दशा संपत आली असें समजा. दोन चार दिवसांआड तुम्हांला एकेक सोन्याचें पीस देत जाईन. त्यांवर तुम्हा सर्वांचा निर्वाह होऊन शिवाय थोडा द्रव्यसंचय देखील करितां येईल.''
मुली म्हणाल्या, ''पण तूं पक्षी असून एवढा मोठा आम्हांवर उपकार करूं पाहतोस याचें आम्हांला मोठें आश्चर्य वाटतें ! आमच्या शेजार्यापाजार्यांना आणि सोयर्याधायर्यांना या आमच्या विपन्न स्थितीबद्दल कांहींच वाटत नाहीं; परंतु तुझ्यासारख्या पक्षाला आमची एवढी कींव कां यावी बरें ?'' हंस म्हणाला, ''मी पूर्व जन्मीं तुमचा बाप होतों. कर्मगतीनें या योनींत मी जन्मलों आहे. तथापि पूर्व पुण्याईमुळें माझीं पिसें सोन्याचीं होतात. मला मनुष्यासारखें बोलतां येतें व पूर्वजन्मीं मी कसा होतों याचें स्मरण करतां येतें.''
हें हंसाचें वृत्त ऐकून त्या मुली चकित झाल्या व आईपाशीं धांवत जाऊन त्यांनीं तें तिला कळविले आपणाजवळ थोडेसे शिल्लक असलेले दाणे त्यांनीं त्या हंसाला चारले, व त्याला प्यावयास पाणी दिलें. त्यानें सोन्याचें एक पीस दिलें व तो तेथून उडून गेला. हा क्रम पुष्कळ दिवस चालला होता. एकदोन दिवसा आड हंसानें येऊन सोन्याचें पीस देऊन जावें, व त्यांनीं तें पीस विकून आपला निर्वाह करावा. या योगें त्या कुटुंबाला लवकरच ऊर्जितावस्था आली. मुलींच्या अंगावर दागदागिने दिसूं लागले; परंतु त्या विधवाबाईची एवढ्यानें तृप्ति झाली नाहीं. एकदिवशी ती आपल्या मुलींना म्हणाली. ''मुलींनो, पशुपक्षादिकांच्या योनींत जन्मलेल्या प्राण्याचा विश्वास मानतां येत नाहीं. आज जरी हा हंस आम्हांला सोन्याची पिसें देत असला, तरी याचें प्रेम असेंच कायम राहील असें कोणी सांगावे ! तेव्हां एके दिवशीं याला पकडून याचीं सर्व पिसें आपण काढून घेऊं.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.