५२. एकाला लांच दिला तर दुसरा देतो

(बब्बुजातक नं. १३७)


एका कालीं बोधिसत्त्व पाथरवटाच्या कुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर तो आपल्या कुलकर्मानेंच उदरनिर्वाह करीत असे. काशीच्या राष्ट्रांत एका खेडेगांवीं एक मोठा सधन व्यापारी रहात असे. त्यानें हजारों सुवर्णकार्षापण जमिनींत गाडून ठेविले होते. कांहीं काळानें त्या कुटुंबांतील सर्व माणसें एकामागून एक मृत्युमुखीं पडलीं. श्रेष्ठीहि मरून गेला. त्याची बायको त्या द्रव्यस्नेहानें मरणोत्तर उंदरीण होऊन त्या द्रव्यावर बीळ करून राहिली. तो गांव त्या व्यापार्‍यानेंच वसविला होता. त्याच्या कुटुंबाची ही दशा झाल्यावर गांवावर देखील तोच प्रसंग आला. सर्व गांव साफ ओस पडला. आमचा बोधिसत्त्व आपल्या निर्वाहासाठीं फिरत फिरत त्या ओसाड गांवाच्या जवळ दुसर्‍या एका खेडेगांवीं जाऊन राहिला. तो त्या व्यापार्‍याच्या मोडक्या घराचे दगड वगैरे घेऊन ते साफसुफ करून दुसर्‍या लोकांना विकून त्यावर आपला निर्वाह करीत असे. उंदरिणीनें त्याला पाहून असा विचार केला कीं, हा मनुष्य फार गरीब दिसतो. दगड फोडून फोडून बिचारा कष्टी होत असतो. माझ्याजवळ असलेल्या या सोन्याच्या नाण्याचा मला कांहींच फायदा होत नाहीं. मी जर याला रोज एकेक कार्षापण दिला तर त्याला त्यापासून फार सुख होईल व तो मलादेखील मदत करू शकेल. असा विचार करून एक कार्षापण तोंडांत धरून ती बोधिसत्त्व दगड फोडीत होता त्या ठिकाणीं गेली. तिला पाहून बोधिसत्त्व म्हणाला, ''उंदरीणबाई, तोंडांत सोन्याचें नाणें घेऊन तूं येथें कां आलीस ?'' ती म्हणाली, ''माझ्याजवळ बराच मोठा नाण्याचा संग्रह आहे. त्यांतून मी तुला रोज एकेक कार्षापण देत जाईन. त्या द्रव्यानें तूं आपल्या कुटुंबाचें पोषण कर व मला पोटापुरतें मांस आणून देत जा.''

बोधिसत्त्वाला ही गोष्ट फारच पसंत पडली, व त्याप्रमाणें रोज एक कार्षापण घेऊन उंदरीला तो पोटभर मांस देऊं लागला. एके दिवशीं एका मुंगसानें त्या उंदरीवर हल्ला करून तिची मानगुटी धरली. बिचारी मरणभयानें गलित होऊन गेली. तिच्या तोंडांतून शब्द निघेना. तथापि, मोठ्या धैर्यानें अडखळत अडखळत ती मुंगुसाला म्हणाली, ''बाबारे, मला खाऊन तुला काय फायदा होणार !''

मुंगूस म्हणाला, ''हें काय विचारतेस ? आजच्या दिवसाचें माझें जेवण होणार आहे आणि याहून दुसरें मला काय पाहिजे आहे ?''

ती म्हणाली, ''माझ्या शरिरांतून जेवढें मांस तुला आज मिळणार आहे तेवढें रोजच्या रोज मिळालें असतां तूं मला सोडून देशील काय ?''

मुंगूस म्हणाला, ''यांत काय संशय. पण खोटें सांगून तूं जर पळून जाशील तर तुझा पुरा सूड उगवीन. बिळांत जाऊन दडून बसलीस तरीदेखील तूं माझ्या कचाट्यांतून बचावणार नाहींस. माझ्या या खरतर नखांनीं तुझ्या बिळाचा ठाव देखील मला खोदून टाकतां येईल, व असा प्रसंग आल्यास हाल हाल करून मी तुला ठार मारीन.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel